बहरून ये अणु अणु जाहली रोमांचित ही तनू नकळत मिळता नजरा दोन्ही लहरत गेली वीज नसांतुनी गेले बाई मी बावरुनी किमया घडली जणू उमलुन आली रात्र चांदणी गंध दरवळे फुलावाचुनी अंगांगावर लहर चंदनी सुख लागे रुणझुणू दंवापरी ते सुख टपटपले ओठांनी या अलगद टिपले आजवरी जे हृदयी जपले तेच लाभले जणू