बाई या पावसानं
बाई या पावसानं लाविली झीम झीम भिजविलं माळरानं उदासलं मन बाई या पावसानं दिनभर देई ठाणं रात्रिस बरसून सकाळिचं लोपविलं कोवळं ऊन छान बाई या पावसानं फुलली ही जाईजुइ बहरुनी वाया जाई पारिजातकाची बाई कशी केली दैन मातींत पखरण बाई या पावसानं ! नदीनाले एक झाले पूर भरूनीया चाले जिवलग कोठें बाई पडे अडकून नच पडे चैन बाई या पावसानं