बाळा जो जो रे
बाळा जो जो रे पापणीच्या पंखांत झोपू दे डोळ्यांची पाखरे ! झोपी गेल्या चिमण्या-राघू चिमण्या राजा नकोस जागू हिरव्या पानावरी झोपली वेलींची लेकरे ! पुरे खेळणे आता बाळा थांबव चाळा थांबव वाळा वनदेवींनी उघडी केली स्वप्नांची मंदिरे ! मेघ पांढरे उशास घेउनी चंद्र-तारका निजल्या गगनी शब्द ऐकते झोपेमधुनी चावळते वारे !