बाळपणींचा काळ सुखाचा, आठवतो घडि घडी । तशि नये फिरुन कधिं घडी ॥ किति हौसेनें टाकिलि असती त्यांत मागुती उडी । परि दुबळी मानवकुडी । मनिं नव्हति कशाची चिंता । आनंद अखंडित होता । आक्रोश कारणापुरता । जें ब्रह्म काय तें मायबाप ही जोडी । खेळांत काय ती गोडी ॥