बांधले मी बांधले इंद्राचे तोरण
बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले शिंपण घातले चाफ्याचे शिंपण घातले उन्हाचे पाटव नेसले, टाकले वार्याचे पैंजण घातले, फेकले डोळ्यांत काजळ, केवडा अत्तर लावले, पुसले हर्षाचे हिंदोळे सोडले, बांधले मयूर मनाचे रुसले, हासले हिंदोळे हर्षाचे, मयूर मनाचे हासले, नाचले दिसला, लपला चकोर मनाचा फुलला, ढळला बहर चंद्राचा लामण सूर्याचा, श्रावण नेत्राचा विझले, तेवले