Back
Fitting…

1 page

बसेना अजुनी कैसा मेळ

बसेना अजुनी कैसा मेळ
चालला संसाराचा खेळ

ज्याला-त्याला छंद वेगळा
जणू सावळा गोंधळ सगळा
घटात नाही पाणी आणिक दिव्यात नाही तेल

कसली पूजा? कसली सेवा?
विटंबना ही तुझीच देवा
फूल मिळेना म्हणुनी आणिला त्रिगुणांचा हा वेल

विस्कटलेली घडी बसावी
उणीव कसली कुणा नसावी
सावरून घे दयाघना तू, आणीबाणीची वेळ

बसेना अजुनी कैसा मेळ

बसेना अजुनी कैसा मेळ
चालला संसाराचा खेळ

ज्याला-त्याला छंद वेगळा
जणू सावळा गोंधळ सगळा
घटात नाही पाणी आणिक दिव्यात नाही तेल

कसली पूजा? कसली सेवा?
विटंबना ही तुझीच देवा
फूल मिळेना म्हणुनी आणिला त्रिगुणांचा हा वेल

विस्कटलेली घडी बसावी
उणीव कसली कुणा नसावी
सावरून घे दयाघना तू, आणीबाणीची वेळ

बसेना अजुनी कैसा मेळ

बसेना अजुनी कैसा मेळ
चालला संसाराचा खेळ

ज्याला-त्याला छंद वेगळा
जणू सावळा गोंधळ सगळा
घटात नाही पाणी आणिक दिव्यात नाही तेल

कसली पूजा? कसली सेवा?
विटंबना ही तुझीच देवा
फूल मिळेना म्हणुनी आणिला त्रिगुणांचा हा वेल

विस्कटलेली घडी बसावी
उणीव कसली कुणा नसावी
सावरून घे दयाघना तू, आणीबाणीची वेळ