भंगलेल्या त्या स्मृतींना
भंगलेल्या त्या स्मृतींना आळवीतो मी पुन्हा हाच का माझा गुन्हा? भाववेडी रम्य प्रीती, स्वप्न अपुले ते बसंती संपले सारे तरी मी आठवीतो त्या खुणा रंग विरला भावनांचा, बहर सरला जीवनाचा घोळवीतो तीच गाथा गिळून सार्या वेदना दु:ख माझे हे गुलाबी, त्यातली धुंदी शराबी शोधितो त्यातून विरल्या प्रीतीच्या संवेदना