भातुकली उधळली अचानक
भातुकली उधळली अचानक रुसे बाहुला, खिन्न बाहुली भातुकली उधळली ! पाटालागी पाट लावुनी चूलबोळकी त्यात मांडुनी खेळ खेळता एक दिलानी अर्ध्यावरती दृष्ट लागली ! पातक देवा ! गतजन्मीचे या जन्मी का भोगायाचे दूषण लागुनी अभिसाराचे सुवासिनीची गणिका ठरली ! संसाराच्या राज्यामधली अखेर राणी दासी ठरली गीत भैरवी गाऊ लागली पूर्वरात्रीला मैफल उठली !