PrintSource

भावफुलांची माला

Bhav Phulanchi Mala

बाबुराव गोखले

भावफुलांची माला, वाहू कुणाला?

देव्हार्‍यामधी देवच नाही
व्याकुळले रे पंचप्राणही
अंतरले का सौभाग्याला?

नयन निरांजनी उजळून ज्योती
ओवाळिन मी तुज पंचारती
पूजारिण ही बसली पूजेला

वांछियली ही मूर्त गोजिरी
हीच प्रकटली मानस मंदिरी
भेटतसे हा जीव शिवाला