PrintSource

भावूक दोन डोळे

Bhavuk Don Dole

ग. दि. माडगूळकर

भावूक दोन डोळे, ना वीट गारगोटी
प्रीतीस पारखे ते रडणार प्रीतीसाठी !

ती एक वेल होती चैत्रात मोडलेली
ती एक गोष्ट होती अर्ध्‍यात सोडलेली
कंठात दाटलेले आले अखेर ओठी !

जी वाट चालले मी, ती जाय वाळवंटी
वेड्यापरी उन्हात मी राहिले करंटी
मी एकटीच आता कोणी पुढे न पाठी !