भेट ती झाली तुझी अन्
भेट ती झाली तुझी अन् गंधता आली जीवा फूल मी झाले कळीचे, धुंदली सारी हवा लाजते माझी मला मी, चालणे मंदावले प्रीतीच्या गंगाजळाने मी सुखाने नाहले मंदिरी माझ्या मनाच्या लाविला रे तू दिवा रंगते लाली कपोली भाववीणा आडवी मीलनाच्या इभ्रतीला ये गुलाबी पालवी भेटणे स्वप्नी तुला रे छंद हा लागे नवा