भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ॥१॥ पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन । तैसें माझें मन वाट पाहें ॥२॥ दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची ॥३॥ भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माउलीची ॥४॥ तुका ह्मणे मज लागलीसे भूक । धांवुनि श्रीमुख दावीं देवा ॥५॥