भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले ! एवढे मी भोगिले की मज हसावे लागले ! ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे पण दुज्यांच्या आसवांनी मज भिजावे लागले ! लोक भेटायास आले काढत्या पायांसवे अन् अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले ! गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी मी कशी होते मलाही आठवावे लागले ! एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले; राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले !