भुई भेगाळली खोल, वल्लं र्हाईली न कुटं पाल्यापाचोळयाचा जीव वहाटुळीशी घुस्मटं. उभ्या धस्कटांचं रान, आयुष्याला भिंगुळवानं मुक्या जात्याच्या पाळूशी ओवी गाते जिवातुन. सये सुगरनी बाई, तुला कशी सांगू गोष्ट दाट दु:खाचं गाठुडं शब्द उचलंना वटं. माय सुगरनी बाई, देई घरट्याशी थारा असं बेवारशी जिनं सोसवेना उन्हवारा.