बिजलीचा टाळ नभाचा मृदंग
बिजलीचा टाळ, नभाचा मृदंग तुझ्या कीर्तनाला देवा, धरती होई दंग थरथरावा कधीही वादळाचा वेल भक्तीभाव वार्यावरी मधुर झुलेल तरंगतो अंतराळी भावपूर्ण ढंग दीपराग गाऊनिया सदा चंद्र-सूर्य सृष्टी-मैफिलीत खुलवी सुरम्य सौंदर्य झळकती नादांतरी निखळ सप्तरंग निशीदिनी नित्यनेमे चाले संकीर्तन किरणांच्या आरतीने सतेज वंदन मांगल्यात ऋतुऋतुंचे मोहरले अंग