Back
Fitting…

1 page

बिनभिंतीची उघडी शाळा

बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू
झाडे वेली पशू पाखरे यांशी गोष्टी करू

बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकूया या भुंग्यांचा
फुलाफुलांचे रंग दाखवील फिरते फुलपाखरू

सुगरण बांधी उलटा वाडा, पाण्यावरती चाले घोडा
मासोळीसम बिनपायांचे बेडकीचे लेकरू

कसा जोंधळा रानी रुजतो? उंदीरमामा कोठे निजतो?
खबदाडातील खजिना त्याचा फस्त खाउनी करू

भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, कड्या दुपारी पर्‍ह्यात पोहू
मिळेल तेथून घेऊ विद्या अखंड साठा करु