PrintSource

बोल कन्हैय्या का रुसला

Bol Kanhaiyya Ka Rusala

उमाकांत काणेकर

बोल कन्हैय्या, का रुसला राधेवरी?

तू अनुरागा भारी चंचल
जैसे वाहे यमुनेचे जल
का रे धरिसी लटक्या रागा?

तुझ्यामुळे बदनामी झाली
नेत्र-पापण्या झुकल्या खाली
सोडी ना रे अपुला त्रागा?