PrintSource

बोलत नाही वीणा

Bolat Nahi Veena

शांताराम आठवले

बोलत नाही वीणा
दुर्दैवाने मुकी जाहली अमृतवाही रसना

कुठले वादन तुटता तारा, कुठले सुस्वर काना
कुठले कूजन सोडून जाता कोकिल हिरव्या राना

काष्ठाच्या कायेत अचेतन सूर ओतिती प्राणा
त्या प्राणांचे सूर शोषणे व्यसन लागले मरणा

तारा जुळता स्वरांत मिळता, दुःखासही ये करुणा
जिवाला संगीत पोचवी चिरंतनाच्या चरणा