PrintSource

बोले स्वर बासरीचा

Bole Swar Basaricha

रमेश अणावकर

बोले स्वर बासरीचा
राधेला छंद तुझा

तरूवेली फुलांतुनी
गोकुळ हसर्‍या नयनी
यमुनातटी कुंजवनी
उधळी गंध मनीचा

कुणीही किती हसू दे तिज
खंत न त्याचा कसला
भरदिवसा घेउन हरी
शिंपी सडा प्रीतीचा

राधेची कृष्णावर
ओढ कुणा ना कळली
प्रभुचरणी गौळण ही
गुंफी भाव अंतरीचा