बोलून प्रेमबोल तू लाविलास
बोलून प्रेमबोल तू लाविलास छंद लावून छंद वेडा केलेस विश्व धुंद धुंदित त्या क्षणांच्या युग एक हे बुडाले घरटे करोनी चिमणे मनपाखरू उडाले वार्यावरी वरात, पथ हा तया अरुंद प्रीतीत रंगलेली विरली उषा प्रभाती छंदात हरवल्या त्या मधुपुनव चांदराती निशिगंध मात्र देई मनभाबडा सुगंध