बुद्ध हवा का युद्ध हवे
घडवाया हे जगत नवे, बुद्ध हवा का युद्ध हवे? सहस्र योजने इथे लोटली मानवताही त्यात लोपली दया-शांती का शांत झोपली विझले अवतीभवती दिवे बुद्ध हवा का युद्ध हवे? भयाण वादळ दिशांत दाही अंधारातील बिकट वाट ही किरण आशेचा कुठेही न लवही पथ उजळाया थटती थवे बुद्ध हवा का युद्ध हवे? त्रिखंडात हा अमुचा प्यारा वैभवशाली शांती मनोरा स्वातंत्र्याचा उज्ज्वल तारा आज भारता नेहरू हवे