चला सख्यांनो, हलक्या हाते नखानखांवर रंग भरा ग, नखानखांवर रंग भरा ! आज सावलीपरी जायचे त्यांच्यामागे पाऊल ग पायी पैंजण बांधा द्याया आगमनाची चाहूल ग सिंहकटीवर स्वैर खेळु द्या रत्नमेखला सैल जरा ! बाहूंवरती बांधा बाई बाहुभूषणे नागाची अंचली झाका हृदयावरची कमळे ही अनुरागाची गळ्यात घाला हार साजिरा, पदकी त्याच्या दिव्य हिरा ! वेणी गुंफा मदनबाण वर भवती हिरवा मरवा ग आकाशातील नक्षत्रांसम माथी मोती जडवा ग सौभाग्याच्या नगरा नेते सौंदर्याचा थाट पुरा !