PrintSource

चांद मातला मातला

Chand Matala Matala

वसंत बापट

चांद मातला मातला
त्याला कशी आवरू?
अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू?

कशी पुनवेची निशा
चढे चांदण्याची नशा
गेल्या हरवून दिशा झाले खुळे पाखरू

आला समुद्र ही रंगा
त्याचा धिटाईचा दंगा
वेड्या लहरींचा पिंगा बाई झाला की सुरू

गोड गारव्याचा वारा
देह थरारला सारा
चांद अमृताचा मनी बाई लागला झरू