चांदण्या रात्रीतले ते स्वप्न
चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा ! आणिले धागे तुझे तू मीहि माझे आणिले गुंफिला जो गोफ त्याचा पीळ तू विसरून जा ! मी दिली वचने तुला अन् वाहिल्या शपथा खुळ्या शब्द केवळ ते, तयांचा अर्थ तू विसरून जा ! प्रीतिचे हितगूज ते, कुजबुज ती, रुसवेहि ते ते हसू अन् आसवे ती- आज तू विसरून जा ! चंद्र ज्याला साक्ष होता, जे फुलांनी पाहिले रेखिले प्राणांत जे मी तेच तू विसरुन जा !