चांदण्यात फिरताना माझा
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात ! सखया रे, आवर ही सावर ही चांदरात ! निजलेल्या गावातून आले मी एकटीच; दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच; ह्या इथल्या तरूछाया पण सारे जाणतात ! सांग कशी तुजविनाच पार करू पुनवपूर? तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर ! श्वास तुझा मालकंस ! स्पर्श तुझा पारिजात !