चुकली ग गोफणफेक
चुकली ग गोफणफेक, लाजरा नेम आज हुकला रानराघुचा कळप बाई ग पिकावरी झुकला पारवा पिकावरी झुकला ही लवली काया घेतां गोफणगिरकी मिसळली तयातच उरांतली थरथर कीं अन् नेम लागला तेढा, आला गळ्यांत गोफणवेढा हांसला पाहुनि गहूं, हरबरा पिकला पारवा पिकावरी झुकला पाहुनी नवतिचा मळा, काळीची कोवळी कळा ये राजरोस वावरीं पाहुणा पायवाट चुकला पारवा पिकावरी झुकला