डाव मांडून भांडून मोडू नको
डाव मांडून भांडून मोडू नको डाव मोडू नको आणले तू तुझे सर्व, मी आणले सर्व काही मनासारखे मांडले तूच सारे तुझे दूर ओढू नको सोडले मी तुझ्याभोवती सर्व गे चंद्रज्योतीरसाचे रुपेरी फुगे फुंकरीने फुगा, हाय, फोडू नको 'गोकुळीचा सखा' तूच केले मला कौतुकाने मला हार तू घातला हार हासून, घालून, तोडू नको काढले मी तुझे नाव, तू देखिले आणि माझे पुढे नाव तू रेखिले तूच वाचून, लाजून, खोडू नको