दादा रुसला ताई रुसली
दादा रुसला ताई रुसली, रुसली आज आई काय करावे काही कळेना, बाई ! म्हणती सारे आज मला, भली खोड की जिरली शाळा सुटता धावत येता स्वारी घसरून पडली आई म्हणते, मला आजला कसली आहे घाई? घाई कसली समजत नाही? लगीन बाहुलीचे ! आईलाही कसे कळेना मन हे आईचे ! माझी छकुली नवरी झाली, आज सासरी जाई हसती सारे मोठ्याने पण डोळा माझ्या पाणी नवरदेव हा किती धिटुकला घेऊन जाई राणी कशी कळेना घडली बाई सारीच ही नवलाई