बया बया बया ! काय झालं बया? दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई ! मोडकंच घर, तुटकंच छप्पर पन र्हायाला जागा नाही मला दादला नको ग बाई ! फाटकंच लुगडं, तुटकीच चोळी पन शिवायला दोरा न्हाई मला दादला नको ग बाई ! कळण्याची भाकर, अंबाड्याची भाजी वर तेलाची धारच न्हाई मला दादला नको ग बाई ! एका जनार्दनी समरस झाले पण तो रस येथे नाही मला दादला नको ग बाई !