दारी उभी अशी मी
दारी उभी अशी मी, गेली निघून रात कुजबुज नाही घडली, झाली अबोल रात ! बिलगून एकमेकां होते कपोत बसले नि:शब्द श्वास त्यांचे दोन्ही उरी मिळाले निर्जीव मीच होते, होती सजीव रात ! दिसला चकोर सखया चंद्रास बाहताना दिसला चुकून वारा कलिकेस चुंबिताना तारेच मोजिले मी, सरली तशीच रात ! स्वप्नात सत्य होते सारे मिळून गेले गंधात धुंद होते ते जीव भावभोळे निर्गंध मी परि रे, गेली रुसून रात !