दारिं याचक उभा प्रिय सखि, दारिं याचक उभा कटाक्षात रमणिच्या लाभे सर्वस्वच वल्लभा नैराश्याचा तम ओसरता प्राचीवरती तेज उजळता मुग्ध उषेच्या गाली विलसते, अवचित अरुणप्रभा अनुरागा वरता प्रीतीने मातीचेही बनेल सोने अद्वैताच्या साक्षात्कारे, घालू गवसणी नभा तू हसलिस की फुले चांदणे संभ्रमात मन फुले दिवाणे हसवितात का नेत्र भासते, दावुनिया मयसभा