दाटे कंठ लागे डोळियां
दाटे कंठ लागे डोळियां पाझर । गुणाची अपार वृष्टी वरी ॥१॥ तेणें सुखें छंदें घेईन सोंहळा । होऊनि निराळा पापपुण्यां ॥२॥ तुझ्या मोहें पडो मागील विसर । आलापें सुस्वर करिन कंठ ॥३॥ तुका ह्मणे येथें पाहिजे सौरस । तुह्मांविण रस गोड नव्हे ॥४॥