PrintSource

देखावे बघण्याचे वय निघून

Dekhave Baghanyache Vay

सुरेश भट

रिमझिमतो रातंदिन
स्मरणांचा अमृतघन
पावसात भिजण्याचे वय निघून गेले

देखावे बघण्याचे
वय निघून गेले
रंगांवर भुलण्याचे वय निघून गेले

रोज नवे एक नाव
रोज नवे एक गाव
नावगाव पुसण्याचे वय निघून गेले

आला जर जवळ अंत
का हा आला वसंत
हाय्‌, फुले टिपण्याचे वय निघून गेले