देश हीच माता
देश हीच माता, देश जन्मदाता घडो देशसेवा ऐसी बुद्धी दे अनंता धर्म पंथ नाही आम्हा जात-गोत नाही मुले माणसाची आम्ही, वंश माणसाई मनी आमुच्या ना काही न्यूनता-अहंता खुली ज्ञान-विज्ञानाची कलांची कवाडे सुखे लाभ घेऊ त्यांचा, शिकू रोज थोडे उद्या उंच होऊ आम्ही, धरू योग्य पंथा विस्मरू न आम्ही केव्हा ध्येय-देशनिष्ठा नव्या भारताला देऊ जगी या प्रतिष्ठा सर्वसाक्षी सर्वागत तू आम्हा यशोदाता