देशिल का रे मजला क्षणभर
देशिल का रे मजला क्षणभर पंख पांखरा तुझे मनोहर मधुर फळांवर मोहरलेली पर्णांतरी ही पल्लवलेली चुंबित राहीन लज्जीत लाली तुझ्यासवे मी वृक्षलतेवर तव स्पर्शाने पुष्पकवीणा भाव मधुर ही सुस्वरताना हास्य सुगंधीत सख्या मोहना उधळीत राहू प्रीतफुलावर दमयंतीच्या प्रेमळ दूता पंख तुझे ते मला लाभता प्रिया भेटण्या ही आतुरता घेत भरारी बघ वायुवर