देव ह्मणे नाम्या पाहें
देव ह्मणे नाम्या पाहें । ज्ञानदेव मीच आहें ॥१॥ तो मी नाहीं दुजा । ज्ञानदेव आत्मा माझा ॥२॥ माझ्या ठायीं ठेवीं हेत । सोड खंत खंडी द्वैत ॥३॥ नाम्या उमज मानसीं । ऐसें ह्मणे हृषिकेशी ॥४॥ आत्मरूपी ज्ञानेश्वर । तोचि ज्ञानाचा सागर ॥५॥ ज्ञानदेवें धरीं भाव । स्वयें होसी तूंचि देव ॥६॥