देवतुल्य बाबा माझे, देवतुल्य आई पूजा रोज करितो त्यांची, अन्य देव नाही पेटवून त्यांच्यापाशी दोन नेत्रज्योती लावुनिया पावन होतो चरणधूळ माथी सदा मागतो मी त्यांचे वरदहस्त डोई शुद्ध भाव आणि त्यांच्या मनी वसे प्रेम वचन सत्य बोलायाचा असे नित्य नेम भल्याबुर्या परिणामांचा खेदखंत नाही नभाहून मोठी माया हृदय सागराचे समाधान खेळे सदनी शांति-वैभवाचे प्रपंचात राहूनिया सत्त्वशील राही