धक्का लागला ग
धक्का लागला ग मघाशी कुणाचा तोल सावरेना बाई अजुनी मनाचा ! उगा हासला तो, उगा लाजले मी करी वीज त्याच्या, उरी भाजले मी ठसा राहिला ग मुक्या भाषणाचा ! पुढे चालले मी, फिरे पाय मागे कशाची कळेना अशी ओढ लागे सुटे त्यात वारा खुळ्या श्रावणाचा ! झरू लागल्या ग ढगांतून धारा मनीच्या विजेचा मनी कोंडमारा ठिकाणा तरी ग कुठे साजणाचा? भिजे पावसाने जरी अंग सारे उफाळून येती उरीचे निखारे शिरे नाद अंगी जणू पैंजणाचा !