धनी तुमचा नि माझा
तरुणपणाचं कौतुक म्हणुनी किती नटू? धनी, तुमचा नि माझा एक काढा फोटू ! करा थाट तुम्ही सरदारी अशी बशीन तुमच्या शेजारी धनी, तुमचा नि माझा एक काढा फोटू ! राजाराणीला चौकट कसली? मैना राघुच्या पिंजर्यात बसली मैना गाईल गीत प्रीतीचे, पोपट बोले 'विठू विठू' धनी, तुमचा नि माझा एक काढा फोटू !