PrintSource

धांवत येई सख्या

Dhavat Yei Sakhaya

वसंत शांताराम देसाई

धांवत येई सख्या । यदुराया ।
ना तरी महिमा जाईल विलया ॥

बघ आचरिला । धर्म जगीं मी ।
शिकविलासि जो । तूंचि कासया ॥

जरी शासन मज । लाज तुला ती ।
ब्रीद राखी निज । समयीं अशा या ॥