धुंद आज डोळे
धुंद आज डोळे, हवा धुंद झाली गाली तुझ्या ग कशी लाज आली? जसा सोनचाफा तुझी गौर कांती नको सावरू ग तुझे केस हाती डौल पारव्याचा तुझ्या मस्त चाली बंडखोर वारा तुला शीळ घाली ! नको दूर जाऊ सखी थांब थोडी किनार्यास भेटे अशी लाट वेडी तुझी पापणी का झुके आज खाली? घडी मीलनाची तुषारात न्हाली ! तुझ्या यौवनाचा फुलावा पिसारा फुटावा कळीला दंवाचा शहारा हवे ते मिळाले अशा रम्य काली नवी रूपराणी, नवा साज ल्याली