PrintSource

धुंद ही हवा तरी

Dhund Hi Hava Tari Phool

जगदीश खेबूडकर

राग म्हणू की अनुराग कळेना
धुंद ही हवा तरी फूल फुलेना

जवळ तू प्रिया की दूर कळेना
सूर मिळाले तरी गीत जुळेना

रूप लाडकी एक वल्लरी
अंग चोरिते लाजबावरी
लहर खेळवी तरी पान हलेना
धुंद ही हवा तरी फूल फुलेना

जीव भाबडा, जाण नसावी
मुक्या मनी का प्रीत हसावी
भेटलो तरी सहवास मिळेना
सूर मिळाले तरी गीत जुळेना