धुंद मधुमती रात रे
धुंद मधुमती रात रे तनमन नाचे, यौवन नाचे उगवला रजनीचा नाथ रे ! जललहरी या धीट धावती हरित तटांचे ओठ चुंबिती येई प्रियकरा, येई मंदिरा अलि रमले कमलांत रे ये रे ये का मग दूर उभा ही घटिकाही निसटुनी जायची फुलतील लाखो तारा परि ही रात कधी कधी ना यायची चषक सुधेचा ओठी लावुनी कटिभवती धरी हात रे