धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना शब्दरूप आले मुक्या भावनांना तुझ्या जीवनी नीतीची जाग आली माळरानी या प्रीतीची बाग झाली सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा तुझा शब्द की थेंब हा अमृताचा तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा उगा लाजण्याचा किती हा बहाणा चिरंजीव होई कथा मीलनाची तृषा वाढते तृप्त या लोचनांची युगांचे मिळावे रूप या क्षणांना