ध्वज अशरण हा
ध्वज अशरण हा ध्वज अमरण हा ध्वज अविरत हा फडकेल ! वीरांच्या रुधिरांत भिजे हा संतांच्या श्रद्धेंत रुजे हा त्रिवर्ण हा निर्भय नीलांतुन जीवन नव बरसेल ! ध्वज अविरत हा फडकेल ! दुर्बल-दलितांचें हा रक्षण मिरविल समतेचें राणेंपण अमानवांचें अंध महाबल यावरती तडकेल ध्वज अविरत हा फडकेल ! नक्षत्रांच्या दिव्य पथांतुन इंद्रधनुष्यांच्या वेशीतुन निळे चक्र हे जाईल, तेथे जगत नवे उमलेल ध्वज अविरत हा फडकेल !