दिलवर माझा नाही आला
दिलवर माझा नाही आला चांद चवथीचा मावळला किती समजावू विकल मनाला मन समजावी फिरुनी मजला आणि घालुनी गळ्यात गळा अश्रुफुलांच्या गुंफित माळा उभी लोचनी व्याकुळलेली अधीरता ही शिणली थकली वाट बघुनिया नीज निजली पापणीच्या पायतळाला नयनकवाडे उघडी अजुनी कशी घेऊ मी बंद करुनी? त्रिभुवन धुंडुन नजरा परतुनी येतिल जर का घेऊन त्याला