दिसाहून दाहक झाली रात कशाला आलीस ग स्वप्नात तगमग तगमग अशी निशिदिनी उरे वेदना भरून जीवनी पुन्हा का घावावर आघात? साद घातली निरोप दिधले कधी न वळली तुझी पाऊले अभागी माझ्या या सदनात नीज निमिषभर थकल्या नयनी तीही तुडविलीस का ग चरणी जाळितो जिवासी एकान्त