दिवस तुझे हे फुलायचे
दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्यावाचून झुलायचे स्वप्नात गुंगत जाणे वाटेत भेटते गाणे गाण्यात हृदय झुरायचे मोजावी नभाची खोली घालावी शपथ ओली श्वासात चांदणे भरायचे थरारे कोवळी तार सोसेना सुरांचा भार फुलांनी जखमी करायचे माझ्या या घरच्यापाशी थांब तू गडे जराशी पापण्या मिटून भुलायचे