दिव्यादिव्यांची ज्योत सांगते
तबकामध्ये इथे तेवती निरांजनाच्या वाती दिव्यादिव्यांची ज्योत सांगते तुझी न् माझी प्रीती समईसंगे आज उजळल्या या नयनांच्या वाती आकाशातील नक्षत्रांच्या लक्ष लाविल्या ज्योती सुवासिनी मी वाट पाहते घेऊन पूजा हाती आज उगवला दिन सोन्याचा हितगूज येई ओठी पतिदेवाला पूजायाला भावफुलांची दाटी दिवाळीत या मंगलसूत्रा शोभा येईल कंठी तुझियासाठी देवापुढती तबक सजविले राया पाट चंदनी समोर मांडून तुझीच होईन छाया तुझ्या पूजनी सार्थ वाटती युगायुगांची नाती