PrintSource

डोळे कशासाठी

Dole Kashasathi

मंगेश पाडगांवकर

डोळे कशासाठी? कशासाठी?
तुला साठवून मिटून घेण्यासाठी

आला भरून पाऊस, नको एकटा जाऊस
सरी कशासाठी, तुला बिलगून भिजून जाण्यासाठी

नाव तुझे मनातले, चांदणेच रानातले
शब्द कशासाठी, तुला आठवून भरून येण्यासाठी

वेल मोहरून आली, फुले अंगभर झाली
वारा कशासाठी, गंधवनातून पाखरू होण्यासाठी

असा तुझा भरवसा, चांदण्याचा कवडसा
ओठ कशासाठी, थोडे थरारून जुळून गाण्यासाठी